मी महाराष्ट्रातील एका खाजगी कनिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक शिक्षक पदावर कार्यरत आहे. आधुनिक जग विज्ञान आणि तंत्रज्ञाने नटलेले जग आहे. शिक्षक
म्हणून कार्य करत असताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हि आवाहने पूर्ण
करत असताना शिक्षकांना अपडेट राहण्याची गरज आहे आणि हाच हेतू समोर ठेवून
ही वेबसाईट तयार करत आहोत, जेणेकरून
शिक्षकांना व विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी बदलत्या काळानुसार गरजेनुसार मदत करणे
शक्य होईल. शिक्षकांना आवश्यक असलेली परिपत्रके, माहिती,
शिक्षण व्यस्थेमध्ये होणारे बदल, शासनाची
धोरणे, शैक्षणिक अपेक्षा, पालकांच्या
अपेक्षा, तसेच विद्यार्थ्यांच्या गरजा संदर्भात
विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मदत करणे हे ध्येय आहे. |