ऑनलाइन शिक्षण

    व्हिडिओ कॉन्फरन्स सारखे लाईव्ह लेक्चरद्वारे ऐकणे म्हणजेच ऑनलाइन शिक्षण असा गैरसमज करून घेण्याचे प्रथम आपण थांबवले पाहिजे. गेल्या महिन्याभरात शहरी भागातील काही शाळांमधून महाविद्यालयांमधून Zoom व तत्सम माध्यमातून ऑनलाइन तासिका भरवण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे हेच ऑनलाइन शिक्षण हा काही जणांचा गैरसमज झालेला आहे. ऑनलाइन शिक्षण याचा सोपा अर्थ तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला घरबसल्या शैक्षणिक सोयी-सुविधा मिळणे. शैक्षणिक संस्थेत न जाता प्रवेशापासून डिग्रीपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपण इंटरनेट या माध्यमातून मिळवू शकतो.

यात पुढील बाबींचा समावेश होतो

प्रवेश प्रक्रिया डिजिटल असणे.

पुस्तके व शैक्षणिक साहित्य इलेक्ट्रॉनिक (फक्त पीडीएफ नव्हे) स्वरूपात मिळणे.

विषय शिकवताना ज्या संकल्पना महत्त्वाच्या असतात त्यांचे सहा ते सात मिनिटाचे छोटे व्हिडिओ युट्युब सारख्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचविणे.

ई-पुस्तके वाचण्यासाठीचे सॉफ्टवेअर तयार करणे.

छापील पुस्तकांच्या डिजिटल आवृत्त्या तयार करणे.

जसे प्रत्यक्ष वर्ग भरतात, तसे ऑनलाइन माध्यमातून वर्ग भरवणे.

E-content वाचून किंवा बघून विद्यार्थ्यांना ज्या शंका उत्पन्न होतात त्याचे निराकरण करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थी यांच्यात थेट सुसंवाद घडवून आणणे.

सत्राच्या शेवटी ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेणे.

त्या परीक्षेसाठीचे प्रश्न कसे असतील त्याची उत्तरे विद्यार्थ्यांनी कशी लिहिणे अपेक्षित आहे त्याचे मूल्यमापन कसे केले जाईल याविषयी आराखडा बनवणे.

परीक्षा आराखड्यानुसार त्या परीक्षा प्रत्यक्ष ऑनलाईन घेण्यासाठी पोर्टल सॉफ्टवेअर तयार करणे.

एकाच वेळी परीक्षा घेता येतील अशा प्रकारची वेळापत्रकाची आखणी करणे.

ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी जे गॅजेट लागतात उदाहरणार्थ डेस्कटॉप, कॉम्प्युटर, लॅपटॉप, स्मार्टफोन, चांगल्या दर्जाचे हेडफोन, वेगवान इंटरनेट याची रास्त दरात उपलब्धता असणे.


ऑनलाइन शिक्षण पोर्टल