आपण नव्या अनुभवांना सामोरे जातांना त्या अनुभवाच्या आशयांचा आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे अर्थ लावून आपण जगत असलेले विश्व समजवून घेणे , या भूमिकेवर ज्ञानरचनावादी तत्त्वज्ञान आधारलेले आहे . ज्ञानरचनावादी शिक्षण प्रक्रियेसंदर्भात प्रामुख्याने पियाजे ,जोहन ड्य़ूई, वायगोटस्की, ब्रुनर आणि यांच्या विचारांशी साम्य असलेल्या आणखी काही शास्त्रज्ञानी आपले विचार मांडलेले आहेत .
ज्ञानरचनावादाची प्रस्तुती वेगवेगळ्या शब्दात विविध
तज्ञांनी केली असली तरी त्यात कोठेही विरोधाभास आढळत नाही .त्या सर्व तज्ञ्यांच्या विचार
नुसार ज्ञानरचना वादाची काही प्रमुख तत्वे आपणास सांगता येतील .
. ज्ञान हे स्थिती शील Static नसून गतिशील DYNAMIC आहे .
. मनुष्य स्वतः शिकत असतो ,आपल्या ज्ञानाची रचना करत
असतो .
. पूर्वानुभवाच्या आधारे मनुष्य ज्ञान रचना करतो .
. सामाजिक , भाषिक व सांस्कृतिक
आंतरक्रीयेद्वारे ज्ञानाची निर्मिती होते .
. स्थानिक परिस्थितीचा / परिसराचा मोठा वाट ज्ञान रचनेत
असतो.
* ज्ञानरचनावादी वर्गाध्यापन
ज्ञानरचनावादी विचारसरणीनुसार नुसार
शिकण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे-
* पूर्वज्ञान
शिकवण्याची प्रक्रिया हि सतत चालणारी प्रक्रिया आहे.
त्यानुसार या संज्ञेचा अर्थ बालक विशिष्ट नवीन घटक शिकण्यापूर्वी त्या घटका संदर्भातील
त्याची आधीची समज असा घेता येईल. वर्गातील
प्रक्रियेत शिक्षकाला मुलाच्या पूर्वज्ञानाचा विचार करून अध्ययन – अनुभवाची निवड व रचना करावी लागेल.
* शिकण्याची तयारी
शिकणाऱ्यांची शिकण्याची तयारी करण्यासाठी त्याची शिकण्याची इच्छा व त्याची पात्रता या दोन्ही गोष्टी आवश्यक
आहेत. त्याचप्रमाणे शिकतांना त्याची भावनिक अवस्था कशा प्रकारची आहे हेही महत्त्वाचे ठरते .भावनिक
स्थिरतेतून भावनिक प्रसन्नतेकडे
जाणारी बालकांची मन: स्थिती हि शिकण्यासाठी योग्य स्थिती असते .
* अध्ययन अनुभव
बालकाला ज्या अनुभावाद्वारे नवीन ज्ञान प्राप्त होणर असते तो अध्ययन-अनुभव ; म्हणजे जो अनुभव आजवर त्याने घेतलेला नव्हता असा
अनुभव, नवीनता हे त्यांचे वैशिष्ट
आहे .या अनुभावाद्वारे नविन माहिती कशा स्वरुपात विद्यार्थ्यांसमोर येते यालाही
महत्त्व आहे .अध्ययन –अनुभव जितके संख्येने जास्त, विषयाला / आशयाला सुसंगत व समर्पक तेवढा अध्ययनाच्या प्रक्रियेत
नेमकेपणा येतो. असे अध्ययन – अनुभव विचारपूर्वक विद्यार्थांना पुरवणे हि
जबाबदारी शिक्षकाची आहे.